सेशन संपले

NGO डिजिटल मास्टरक्लास 2

तुमच्या NGO चं काम डिजिटल पद्धतीने करणं, AI टूल्स वापरणं, देणगीदार आणि पावत्या आपोआप सांभाळणं आणि CSR निधीसाठी तयारी करणं शिका. लाइव्ह ऑनलाइन.

  • शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६
  • १०:०० AM – ११:५९ AM IST
  • Google Meet
  • मराठी (Marathi)
फी₹249फक्त

रेकॉर्डिंग समाविष्ट · सहभाग प्रमाणपत्र · 100% सुरक्षित पेमेंट

या सेशनची नोंदणी बंद झाली आहे

ही बॅच संपली आहे. पुढची बॅच लवकरच याच पानावर जाहीर होईल.

हे कोणासाठी आहे

  • NGO, ट्रस्ट किंवा सेक्शन 8 कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि सचिव
  • संस्थेचे हिशोब, देणगी आणि सरकारी कागदपत्रं सांभाळणारे कर्मचारी
  • ज्यांना देणगी वाढवायची आहे आणि नवीन देणगीदार जोडायचे आहेत असे कार्यकर्ते
  • जे अजूनही Excel, वही किंवा कागदावर काम करतात आणि आता ऑनलाईन जायचं आहे
  • ज्यांना नवीन NGO सुरू करायची आहे आणि सुरुवातीपासून योग्य पद्धतीने काम करायचं आहे

सेशनमध्ये काय होईल

1 तास 59 मिनिटे लाइव्ह

  1. 1NGO चं सगळं काम मोबाईल आणि कॉम्प्युटरवर कसं करायचं — रजिस्टर आणि कागदपत्रांचा त्रास कसा कमी करायचा
  2. 2ChatGPT सारखे सोपे AI टूल्स वापरून पत्रं, रिपोर्ट, पोस्ट आणि प्रस्ताव काही मिनिटांत कसे तयार करायचे
  3. 3Excel आणि वहीतल्या नोंदी एका सोप्या ऑनलाईन सिस्टममध्ये कशा आणायच्या — काहीही न हरवता
  4. 4देणगीदारांची माहिती एका ठिकाणी कशी ठेवायची, आणि देणगी मिळताच 80G पावती आपोआप कशी पाठवायची
  5. 5UPI आणि WhatsApp वापरून ऑनलाईन देणगी कशी गोळा करायची — एकही रुपया कमिशन न देता
  6. 6FCRA, 10BD आणि 10BE सारखी सरकारी कामं वेळेवर आणि CA शिवाय कशी पूर्ण करायची
  7. 7कंपन्यांकडून CSR निधी मिळवण्यासाठी काय तयारी लागते आणि प्रस्ताव कसा पाठवायचा
  8. 8लाइव्ह प्रश्नोत्तरे

का सहभागी व्हावे

  • आम्ही आतापर्यंत 100 पेक्षा जास्त NGO ना देणगी गोळा करायला आणि त्यांचं काम ऑनलाईन करायला मदत केली आहे
  • भारतातील 100 पेक्षा जास्त NGO रोज SevaStack वापरतात — त्यांचा अनुभव तुम्हाला थेट सांगणार आहोत
  • आम्ही 10 पेक्षा जास्त NGO चे हिशोब आणि सोशल मीडिया स्वतः सांभाळतो, त्यामुळे खऱ्या अडचणी आम्हाला माहिती आहेत
  • हा क्लास SevaStack चे संस्थापक स्वतः घेणार आहेत — फक्त पुस्तकी माहिती नाही, तर रोजच्या कामात वापरता येईल असं शिकवणार
  • फक्त ₹199 मध्ये 2 तासांचा लाईव्ह क्लास, तुमच्या प्रश्नांना तिथेच उत्तरं, आणि नंतर रेकॉर्डिंग पण मिळेल
  • क्लास पूर्ण केल्यावर तुम्हाला सहभाग प्रमाणपत्र (Certificate) मिळेल

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

जॉईन करण्याची लिंक कशी मिळेल?

पेमेंट केल्यावर लगेच WhatsApp वर. ईमेल दिला असेल तर ईमेलवरही.

लाइव्ह सेशन चुकलं तर?

प्रत्येक नोंदणी केलेल्या व्यक्तीला सेशननंतर WhatsApp वर रेकॉर्डिंग मिळते, ती तुम्ही नंतर पाहू शकता.

फी परत मिळेल का?

फी परत मिळत नाही. तुम्ही येऊ शकला नाहीत तरी पूर्ण रेकॉर्डिंग मिळते.

लॅपटॉप लागेल का?

नाही. सेशन Google Meet वर आहे, जे फोन किंवा लॅपटॉप दोन्हीवर चालते.

सेशन कोणत्या भाषेत आहे?

मराठी (Marathi).

प्रमाणपत्र मिळेल का?

हो, सेशननंतर सहभाग प्रमाणपत्र मिळेल.